ॲटो रिक्षा चालक मालक संघटना लाल बावटाची भाडे वाडी संदर्भात बैठक संपन्न
माजलगाव:- आज माजलगाव शहरामध्ये ऑटो रिक्षा चालक मालक संघटना लालबावटाची ऑटोचे भाडेवाढ करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये वाढती महागाई वाढलेले पेट्रोल डिझेलचे भाव व जीवन आवश्यक वस्तू ची दरवाढ या मुद्यावर चर्चा करून तसेच दिवस अडचणीमध्ये येणारा ऑटो चालक वाढती महागाई लक्षात घेता तसा त्यांची उपजीविका चालवण्यासाठी भाडेवाढ करण्याची गरज आहे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या आठ दहा वर्षांमध्ये महागाई फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढ झालेली आहे परंतु गेल्या दहा-बारा वर्षापासून ऑटोच्या भाड्यामध्ये एक रुपयाची तुला वाढ झालेली नव्हती ही गोष्ट लक्षात घेता पुढील प्रमाणे ऑटोच्या भाड्यामध्ये दरवाढ करण्यात आली आहे. याची नोंद माजलगाव शहरातील व परिसरातील नागरिकांनी घ्यावी नवीन दर पुढीलप्रमाणे आहे. जुना बस स्थानक ते नवीन बस स्थानक १०रू. जुना बस स्थानक ते संभाजी चौक १५रू. नवीन बस स्थानक ते संभाजी चौक १०रू, जुने बस स्थानक ते चिंचगव्हाण १५ रू,जुना बस स्थानक ते केसापुरी कॅम्प १५ रू, बस स्थानक ते मोन्कॉट जिनिंग २०रू. जुना बस स्थानक ते नवीन मोंढा २० रू, नवीन बस स्थानक ते संभाजी चौक १०रू. नवीन बस स्थानक ते चिंचगव्हाण १५रू. नवीन बस स्थानक ते केसापुरी कॅम्प १५रू. नवीन बस स्थानक ते मंगल कार्यालय, वीट भट्टी,साबळे पेट्रोल पंप ,जिनिंग ,नवा मोंढा २० रु. संभाजी चौक ते केसापुरी कॅम्प १५रू. संभाजी चौक ते मंगल कार्यालय, वीटभट्टी ,जिनिंग नवा मोंढा २०रू. आज पासून हे नवीन दर लागू करण्यात आलेले आहे. तरी बैठकीचे अध्यक्ष म्हणून कॉम्रेड शेख चूंनु, मार्गदर्शक कॉम्रेड सादेक पठाण,श्रीराम अवचार, तालिब देशमुख, मंगल भोपळे,राहुल चांदमारे, उमेश भायकर,अशोक गाडेकर,अफजल पठाण,विक्रम अवचार, संदिपान कांबले,राजू आवड, बप्पा भिसे,अजय,साळवे, यांच्या सह आदी ऑटो रिक्षा चालक मालक उपस्थीत होते.