आ. प्रकाश दादा सोळंके तेलंगणा राज्याच्या वाटेवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आ. प्रकाश सोळंके यांनी घेतली भेट.....
माजलगाव प्रतिनिधी... काही दिवसापूर्वी महाविद्यालयात पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कार्याचे कौतुक केले होते आणि असे म्हटले होते की मला जर वाटेल तर मी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्षात देखील जाऊ शकतो असेही प्रकाश दादा सोळंके यांनी म्हटले होते तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे धोरण आणि योजना मुख्यमंत्री म्हणून तेलंगणा राज्यात विकासात्मक योजना ची आखणी करीत आहे व देशभर आदर्शवत मुख्यमंत्री म्हणून आज त्यांचे कौतुक होत आहे त्यांची काम करण्याची पद्धत शेतकरी विद्यार्थी कामगार मंजूर आणि इतर घटका विषयी असलेली काम करण्याची महत्त्वाकांक्षा याबाबत सविस्तर चर्चा आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी केली होती तेलंगणा राज्यात मेडिकल इंजिनिअरिंग व अन्य उच्च शिक्षणासाठी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना लागणारा खर्च राज्य सरकार करते महाराष्ट्र राज्यांनी देखील केसीआर यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आणि उद्याची भविष्य असणाऱ्या तरुणासाठी ठोस अशी धोरणे आणि योजना करून गतिशील महाराष्ट्रासाठी प्रयत्न करावे असे मत देखील आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी युक्त केले.