जिल्ह्यातील सर्व पशु बाजार सुरू करण्यास अटीच्या अधीन राहुल परवानगी...
जिल्हा अधिकारी दीपा मुधोळ मुंडे...
गोवशीय पशु धनास लंम्पी प्रतिबंधक लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बाळगणे गरजेचे जिल्ह्यातील लम्पी स्किन डिसीज या जनावरांमधील संसर्ग रोग नियंत्रणात...
माजलगाव प्रतिनिधी.. बीड जिल्ह्यातील शंभर टक्के गोवशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून सदर प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने शासनाच्या पशुवर्धन विभागाच्या सक्षम प्राधिकरणाने गोवंशाया पशुधनास लम्पी चर्मरोग पतीबंधक लसीकरण केले बाबतचे प्रमाणपत्र संबंधितांनी बाळगण्याचे अटीचा अधीन राहून जिल्ह्यातील सर्व पशु चे बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे असे आदेश अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हा अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागांच्या अधिसूचना 29 नोव्हेंबर 2022 च्या नुसार प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत यापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज या या जनवारामध्ये या रोगाचे लक्षण आढळून आल्याने पूर्वी निर्बंध घालण्यात आले होते लम्पी स्किन डिसीज या जनावरामध्ये आढळणाऱ्या आजारामुळे पशु बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती विषयक व आर्थिक अडचणींना समोर जावे लागत आहे त्यामुळे सदर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय बीड यांच्या वतीने आदेश निर्गमित आले आहे.