माजलगाव ग्रामीण पोलिसांनी शेतात चाललेल्या जुगारावर टाकली धाड....
माजलगाव प्रतिनिधी... माजलगाव शहरा जवळ असणाऱ्या एका फॉर्म हाऊस मध्ये पोलिसांनी रविवारी दि.12.रोजी रात्री धाड टाकली यावेळी जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले दरम्यान जुगार्याकडून पोलिसांनी 6.लाख 84 .हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केले गुप्त खबर या मार्फत अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांना माहिती मिळाली की माजलगाव येथील एका फार्म हाऊस मध्ये जुगार खेळल्या जात आहे त्यानुसार स. पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस हवालदार तांगड पोलीस शिपाई सुरवसे पोलीस शिपाई आतकरे पोलीस शिपाई खंदारे यांनी माजलगाव गाठले व येथील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार एसबी मोरे व पोलीस हवालदार भडाने यांना सोबत घेऊन फॉर्म हाऊस वर धाड टाकली यावेळी पोलिसांना संबंधित शेतामध्ये जुगार खेळणारे जुगारी दिसून आले दरम्यान पोलिसांनी यावेळी दोन मोटरसायकल एक चार चाकी वाहन व सात मोबाईल असा एकूण 6. लाख 84 .हजार 470 .रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी यावेळी विठ्ठल पांडुरंग सोळंके रघुनाथ आत्माराम मते दत्ता त्र्यंबक कोरडे शिवाजी भगवान राऊत वासुदेव रखुमाई वीरभद्र पंचास्वामी अरविंद दिगंबर नाईक नवरे यांच्यासह अनेक जनावर मुंबई जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.