बीडमध्ये अर्धनग्नअवस्थेत आढळली 35 वर्षीय महिला अत्याचार झाल्याचा संशय....
माजलगाव प्रतिनिधी... बीड शहरातील यशवंतराव चव्हाण चमन उद्यानात 35 वर्षीय महिला अर्धनग्न व शुद्ध हरपलेल्या अवस्थेत दिसून आल्याने बीड शहरात एकच खडबड उडालेली आहे आज पहाटे याबाबतची माहिती पोलिसांनी मिळाली त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे या महिलेवर अत्याचार करण्यात आल्याच्याही प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्यामुळे बीड शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार बीड शहरातील यशवंतराव चव्हाण चमन उद्यानात 35 वर्षीय महिला अर्धनग्न व शुद्ध हरपलेल्या अवस्थेत आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या महिलेला दोन ते तीन अनाथ लोकांनी तुझा पती तिकडे थांबला आहे असे खोटे सांगून तिला यशवंतराव चव्हाण या उद्यानामध्ये नेले त्या ठिकाणी तिच्या जवळचा मोबाईल काढून घेतल्याची ही तपासामध्ये समोर आलेले आहे याबाबतची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे तपासणीनंतर तिच्यासोबत अनुचित प्रकार घडला आहे का याबद्दलची माहिती समोर येईल मात्र यामुळे वीर शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनण्याचे समोर आले आहे दरम्यान बीड मध्ये अल्पवयीन नशे खोराकडून अवघ्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने बीड येथील नागरिक व महिला संताप युक्त केला जात आहे.