वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्काराचे आज आयोजन उपस्थित राहावे -गफार खा प्रेम जगतकर. परळी प्रतिनिधी-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्ते व ही चिंतक यांनी उद्या दुपारी बारा वाजता चेंबरी रेस्ट हाऊस येथे उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफारशहा खान वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या बहाद्दर उमेदवारांनी निवडणूक लढवून प्रस्थापितांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला व स्वाभिमान दाखवून दिला त्याबद्दल परळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ज्यांनी ज्यांनी निवडणूक लढवली अशांच्या आज दिनांक 10.1.2023 रोजी दुपारी बारा वाजता चेंबरी रेस्ट हाऊस येते वंचित बहुजन आघाडीचे बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष माननीय शैलेश भाऊ कांबळे यांच्या शुभहस्ते तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव अडवोकेट संजय रोडे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेंजित रोडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर गौतम भाऊ साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल इच्छिंतक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे परळी शहराध्यक्ष गफारशहा खान व वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्काराचे आज आयोजन उपस्थित राहावे
सोमवार, जनवरी 09, 2023
0