परळी पोलिसाच्या नाकावर टिचून आयपीएस धीरज कुमार बच्चू च्या पथकाने गांजा विक्रेता पकडला...
परळी शहरातील वटसावित्री नगर भागात सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ धिरज कुमार बच्चू यांच्या परळी येथे पथकाने छापेमारी करत गांजा जप्त केला पोलिसांनी या कारवाईत सतरा हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा गांजा पकडला आहे या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात आरोपी विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहे सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील वटसावित्री नगर भागात गांजा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव येथील पोलीस उपनिरीक्षक बोडके कांबळे पोलीस हवालदार राठोड देशमुख राऊत महिला पोलीस नाईक ढगे पोलीस कॉन्स्टेबल भिसे यांनी वटसावित्री नगर भागात राहणाऱ्या संतोष दगडोबा मस्के वय वर्ष 42 दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी दुपारी चारच्या दरम्यान छापा मारला असता म्हस्के यांच्या घरातील जनावराच्या पत्राच्या गोठ्यामध्ये लोखंडी बॅरेल मध्ये प्लास्टिकच्या पिशवीत एकूण 1.735. किलोग्राम वजनाचा गांजा मिळाला ज्याची किंमत 17350.. रुपये असून हा गांजा संतोष मस्के यांनी बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी ठेवून पोलिसाची दिशाभूल केली तसेच धीरज कुमार बच्चू यांचे पथक आल्याची चाहूल लागतात तू निघून गेला या प्रकरणी बालक पांडुरंग कोळी पोलीस निरीक्षक नेमणूक पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीणच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे परळी शहर येथे संतोष दगडू मस्के वय 42 वर्ष राहणार वड सावित्री नगर परळी वैजनाथ तालुका परळी जिल्हा बीड यांच्या विरोध गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२३ प्रमाणे गुंगी कारण औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम 1985 च्या कलमा अंतर्गत ८)(b)20 गून्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाची पुढील तपास परिसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहे.