माजलगावचे ग्रामदैवत धर्मराज समाधी देवस्थान वर नाव लावून मंदिरासह जमीन हडपण्याचा प्रयत्न
-----------------------------------------------------------देवस्थान व जमीन हडप करण्यावर हिंदु भाविकांचा आक्षेप
-----------------------------------------------------------
माजलगाव दि.१५ ( प्रतिनिधी ):- माजलगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या पुरातन धर्मराज समाधी देवस्थान वर नाव लावून मंदिर व जमीन हडपण्यासाठी जातीचा व धर्माचा धाक दाखवून रविंद्र विठलराव ससाणे यांनी न.प.कडे नावलावण्यसाठी अर्ज केला आहे परंतु या नाव लावण्याला हिंदू भाविक भक्तानी मुख्याधिकारी यांच्या कडे लेखी आक्षेप घेवुन योग्यती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या आक्षेपात म्हटले आहे की, सिंदफणानदीच्या काठावर शहराचे ग्रामदैवत असलेले पुरातन धर्मराज समाधी मंदिर व महालक्ष्मी अशी दोन मंदिरे आहेत.महसूल विभागाचे मंडळ अधिक माजलगाव यांनी दि.५/ ८/२०१५ रोजी केलेल्या पंचनाम्यात धर्मराज समाधी मंदिर व महालक्ष्मी मंदिर अशी दोन मंदिरे दाखवले आहेत.आणि दि.२८ /०८/ २०६ रोजी तालुका भूमिअभिलेख माजलगाव यांनी मोजणी करून दिलेल्या नकाशात मंदिरे दाखवली आहेत. परंतु गट नंबर २२६ मधील सर्वे नंबर ३६९ मधील विठ्ठल दगडु ससाणे यांना शासना कडून गायरान जमीन मिळाली होती परंतु त्यांच्या वारसदार श्रीमती जिजाबाई विठ्ठल ससाणे, शिवकांत किशोर ससाणे, मिलिंद विठ्ठल ससाणे, रवींद्र विठ्ठल ससाणे यांनी दि.२८ /०४/ २०१० रोजी मा जिल्हाधिकारी बीड यांच्या न्यायालयात शपथपत्रा अधारे करारनामा करून मिळालेली जमीन गट नं. २२६ सर्वे न.३६९ मधील २ एकर ०४ गुंठे जमीन शाम धर्यशिल कदम,जयंत जनार्दन जाधव,संजय मनमोहनराव नलावडे, वसंत गणपत निवंगुणे यांना विक्री केली .त्या नंतर त्यातील शाम धैर्यशील कदम यांनी त्या जमीनीतील काही जमीन दि.२/ १२/ २०१७ रोजी संजय रामचंद्र जावळे यांना आणि दि.१७/११/ २०१७ रोजी अशोक कचरू जाधव यांना विक्री केली आहे.त्यामुळे सदर जमिनीवर रविंद्र विठ्ठल ससाणे यांचा काही संबंध राहिलेला नाही हे सिध्द होत आहे.
तरी देखील रवींद्र विठ्ठल ससाणे यांनी गट नंबर २२६ मधील सर्व नंबर ३६९ मधील धर्मराज समाधी देवस्थान व जमिनीवर नाव लावण्यासाठी अर्ज केला तेव्हा मुख्याधिकारी यांनी जाहीर नामा वृत्तपत्रा मध्ये प्रसिध्द दिल्याने सदर अर्जावर हिंदु भाविक राजेभाऊ कुमावत,नगरसेवक प्रताप लाटे,सिध्दार्थ साळवे,रामेश्वर विठ्ठल जमदाडे,पत्रकार दत्ता येवले,रामचंद्र दराडे,नरेंद्र डुकरे, मारोती सांवत, यांनी लेखी आक्षेप दिला आहे.