अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
दिंद्रुड परिसरात उडाली एकच खळबळ..
एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना रविवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली दरम्यान दिंद्रुड पोलीस ठाण्यातच पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्या खळबळ जनक घटनेने दिंद्रुड परिसर हादरला आहे बीडच्या माजलगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे पर जिल्ह्यातील एक कुटुंब कामासाठी दिंद्रुड परिसरात सालगडी म्हणून काम करते दरम्यान रविवारी सकाळी आई वडील शेतात कामाला गेले असताना आरोपीने पीडित मुलीला एका उसाच्या फळात ओढत नेले तिथे त्याच्यावर अन्य तिघांनी आळीपाळीने अत्याचार केले एका महिलेने या सदर घटना घडत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले सदर पीडित मुलगी ही सतरा वर्षाची अल्पवयीन आहे या घटनेमुळे दिंद्रुड व परिसरात एकच खळबळ माजली आहे अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीससात एका महिलेसह चार वर बाल लैंगिक अत्याचार ॲट्रॉसिटी, 376, नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान दिंद्रुड पोलीस स्टेशनला पोलीस उपविभागीय अधिकारी आयपीएस डॉ. धीरज कुमार बच्चू यांनी भेट देत तीन आरोपींना तात्काळ बंद केले सदर कारवाई दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुडगे, युवराज श्री डोळे, विशाल मुजमुले, मुकेश शेळके, रेवन दुधाने, आदींनी केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत पुढील तपास डॉ धीरज बच्चू करीत आहे