मनुर रोड महबूब नगर येथील नळाची पाईपलाईन वाढवा.नाजेर कुरेशी यांनी माजलगाव नगरपरिषद च्या अधिकारींना आज निवेदन देण्यात आलेले आहे...
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज...
माजलगाव दिनांक 19/12/2022 काही दिवसांपूर्वी माजलगाव शहरातील महबूबनगर मध्ये नगरपालिकांनी पाईप लाईन चे काम केले होते जे की ते मेन रोड पर्यंतच काम केले आहे नागरिकांच्या घरापासून पाचशे ते सातशे मी अंतरावर आहे तिथून पाईपलाईन घ्यायची म्हटल्यावर रहिवासींना व नागरिकांना त्यांचा खर्च पण जास्त होत आहे महबूबनगर येथील रहिवासी हे नागरी हातावर पोट असणारे आहे मेहबूब नगर येथे खूप गरीब लोक राहतात ऐवढा पाईप लाईन चा खर्च कुठून आणणार व आपल्या कार्यालयाची फी पावती चा खर्च वेगळा व पाईप लाईन चा खर्च वेगळा एवढा खर्च येथील गरीब नागरिक करू शकणार नाहीत नगरपालिकेने या निवेदनाची दखल घेऊन पूर्ण पाईपलाईन करून देण्यात यावी अशी मागणी नाजेर कुरेशी यांनी नगरपरिषद ला काल दिलेल्या निवेदनात केली असून हे काम काही दिवसात न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नाजेर कुरेशी यांनी दिला आहे.