परळीत 16 एप्रिल रोजी समाज परिवर्तनावर आधारित भीमयुग नाटकाचे व भीम नगर येथील भूमिपुत्राच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन. बालासाहेब जगतकर
परळी प्रतिनिधी-परळीत 16 एप्रिल 2023 रोजी भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुठि बुद्ध विहार येथे सायंकाळी सहा वाजता समाज परिवर्तनावर आधारित भीमयुग या नाटकाचे व भीम नगर येथील भूमिपुत्राच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख वंचित बहुजन आघाडी बीड पूर्व यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त परळीत 16 एप्रिल रोजी परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहार येथे सायंकाळी सहा वाजता समाज परिवर्तनावर आधारित भिम युग या नाटकाचे आयोजन व परळी शहरातील भीम नगर येथील उच्च शिक्षण घेऊन बाहेरगावी आपले कर्तव्य बजावीत आहेत अशा भूमी पुत्रांचा गौरव कार्यक्रमाचे आयोजन तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी दिली असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त भीमसैनिकांनी उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.