जिल्हा रुग्णालय बीड येथे डिलिव्हरी वार्डात पैशाशिवाय कोणीच कुणाला सोडेना...
माजलगाव प्रतिनिधी... जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयातील अनेक अडचणी सोडवल्या असून कर्मचाऱ्यांना नियमानुसार काम करण्याचे आदेश दिले आहेत बीड जिल्ह्यात आज एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून डॉक्टर साबळे यांची चर्चा होत असताना जिल्हा रुग्णालयातील डिलिव्हरी वार्डा मधील डिलिव्हरी झाल्यानंतर पैसे घेण्याचे प्रकार समोर येत असल्याने डॉक्टर साबळे यांच्या प्रतिमेला धक्का लागत आहे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास एक हजार रुपये तर सिजर झाल्यास पाचशे रुपयाची मागणी होत असून नातेवाईकाकडून पैसे घेत असल्याचे चित्र पुढे आले असून शासनाकडून लाखो रुपयांची पगार घेत असतानाही जिल्हा रुग्णालयातील आलेल्या गोरगरिबाकडून पैसे वसुलीचा धंदा कोणाच्या आशीर्वादाने होत आहे या गंभीर बाबीकडे डॉक्टर सुरेश साबळे लक्ष देतील का डिलिव्हरी वार्डातील चाललेल्या पैशाचा खेळ थांबण्यात त्यांना यश मिळेल का असे एक ना अनेक प्रश्न नागरिकाकडून उपस्थित केले जात आहे जिल्हा रुग्णालयात सामान्य गरीब रुग्ण येतात व त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्याने शासकीय रुग्णालय त्यांच्यासाठी एक आधार असते मात्र याच रुग्णालयात जिल्हा रुग्णालयातील दररोज उपचारासाठी शेकडो रुग्ण आजूबाजूच्या गावातून येत असतात खेड्या गावातून येणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयाची माहिती नसल्यामुळे त्या लोकांना जसं सांगाव तसं ते करत असतात डिलिव्हरी साठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे चक्क डिलिव्हरी वार्डात हजार हजार रुपये घेत असल्याचे समोर आल्यानंतर गरीब माणसाने पैसे आणायचे कुठून हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात असून रुग्णाकडे पैसे असले असते तर त्यांनी खाजगी हॉस्पिटल मध्येच आपली डिलिव्हरी केली नसती का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे या अगोदर देखील डिलिव्हरी वार्डाचे प्रकरण समोर आले होते पुन्हा एकदा डिलिव्हरी वार्डात मावश्या कडुन पैसे घेतले जात असल्याचे समोर आले आहे या प्रकरणा कडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे कारवे करतील का अशी चर्चा जोर धरू लागली आहे.