यावल पंचायत समितीचे नविन गटविकास अधिकारी पदी. विश्वनाथ धनके
यावल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी विश्वनाथ चावदस धनके यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी त्यांच्या पदभार पदभार नुकताच स्वीकारला आहे.यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख हे ३१ जानेवारी २३ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाल्या पासुन हे पद रिक्त होते.त्यांच्या जागेवर नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी म्हणून विश्वनाथ चावदस धनके यांच्याकडे या पदाची सुत्रे सोपविण्यात आली आहे याबाबत बुधवारी १४ फेब्रुवारी २३ रोजी जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहे.
सदरील गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार सांभाळणारे विश्वनाथ चावदस धनके यांना शिक्षण विभागाच्या विविध क्षेत्रात प्रशासकीय सेवा वजावण्याचा दांडगा अनुभव आहे.गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी बालकांचे मोफत व सक्तीचा शिक्षण विषयक अधिकार,शाळेत नियमित उपस्थित राहुन अभ्यासक्रम वेळेत व व्यवस्थितपणे पुर्ण करणे,विद्यार्थ्यांच्या उज्वल शैक्षणिक भविष्यासाठी प्रभावीपणे शासकीय योजनांची अमलबजावणी करणे तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण शिस्त व नियमांचे पालन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यासाठी
सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांच्या पाऊलांवर पाऊल टाकून आपण सर्व शिक्षण विभागातील आपले सह कर्मचारी शिक्षक बांधवांना सोबत घेऊन विश्वासाहर्तेने काम करणार असल्याचा विश्वास नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी व्यक्त केला आहे.