जिल्हा परिषद माध्यमिक शाळा (मुलांची)मुख्याध्यापकाच्या नियुक्तीसाठी घंटानाद आंदोलन!
सामाजिक कार्यकर्ते अशोक ढगे यांनी निवेदन देताच मूख्याध्यापकाची नियूक्ती.
माजलगाव
शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची हि प्रशाला उर्दू व मराठी माध्यमाची असुन या ठिकाणी गोर-गरीब शोषीत,वंचित वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात.अशा शाळेतील मुख्याध्यापकांचे निलंबन होऊन आज जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी ओलांडून गेला असतानाही या ठिकाणी मुख्याध्यापकाची नियुक्ती केल्या जात नसल्याने प्रशासनास जागवण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालय समोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना दिलेल्या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते अशोक ढगे यांनी म्हटले आहे.या शाळेच्या मुख्याध्यापकाचे पद वर्ग-२ चे असून अद्याप पावतो कोणाकडेही या ठिकाणचा प्रभारी पदभार प्रशासनाने सोपावलेला नाही.निलंबित मुख्याध्यापकांनी या ठिकाणी निगारणकारांची नियुक्ती केलेली आहे.त्यावरच आजरोजी शाळा चालते.यामुळे अनेक पालकांतून आश्चर्य व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हि शाळा शहरातील सर्वात जुनी शाळा आहे.पुर्वी या शाळेने शहरातील अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे.परंतु आज मात्र या शाळेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच,पटावर जास्त विद्यार्थी परंतु प्रत्यक्षात कमी उपस्थिती व भरमसाठ वर्ग खोल्या असणारी शाळा असाच समज तालुक्यात पसरल्याचे दिसून येत आहे.नविन मुख्याध्यापकाची नियुक्ती न केल्याने या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक नुकसान होत आहे.व यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे.आज शाळेत विविध उपक्रम राबवण्यास अडचणी निर्माण होत आहेत.इयत्ता दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून विद्यार्थ्यांना ना मार्गदर्शन ना उद्बोधन अशी अवस्था निर्माण झालेली आहे.यामुळे शिक्षणाच्या मुख्य टप्प्यावरच त्यांना सुनियोजितपणे गाळण्याचे पातक घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.व यातून शैक्षणिक नुकसान व हानी होत आहे.त्यामुळेच दि.25.02.2023 रोजी पर्यंत जर मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्यात आली नाही तर,दि.27.02.2023 रोजी मुख्याध्यापकाच्या रिकाम्या खुर्चीस माल्यार्पण करून गटविकास अधिकारी कार्यालय समोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक ढगे यांनी निवेदन देताच तात्काळ जि.प.मूख्याध्यापक ची नियूक्ती करण्यात आली.