वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी अशोक हिंगे यांची फेरनिवड झाल्याबद्दल गेवराई तालुका पदाधिकारी यांनी सत्कार केला.
वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी अशोक हिंगे पाटील यांची निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून जल्लोषात सत्कार.
वंचित बहुजन आघाडी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अदेशावरुन प्रदेश अध्यक्ष मा. रेखाताई ठाकुर यांना मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी मा. अशोक भाऊ हिंगे पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. प्रभावीपणे पक्ष वाढ व संघटण मजबुत करण्यासाठी सर्व जाती धर्मातील युवकांसह वयोवृध्दांना संघटीत करण्याची कुशलता व श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू असलेले अशोक भाऊ हिंगे पाटील यांना पुन्हा मराठवाडा विभागाच्या अध्यक्ष पदाची धुरा दिल्याने गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जंगी स्वागत करत वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका संपर्क कार्यालयात हृदय सत्कार केला यावेळी तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड, शहराध्यक्ष दस्तगिर शेख, किशोर भोले, अजय सरवदे, ज्ञानेश्वर कवठेकर, बालाजी जगतकर, पुरुषोत्तम वीर, सचिन कांडेकर, किशोर चव्हाण, सुदेश पोद्दार, रांजेद्र अडसूळ, बाळासाहेब मुळिक,अजय खरात, राजु गायकवाड, विकास गायकवाड,ज्ञानेश्वर हवाले सह ईतर शेकडो कार्यकर्त्ये उपस्थित होते.