बोगस ऍडमिशन केलेल्या बालकाची त्या शाळेने चक्क टीसी दिला.
बीड जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग बालकांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्या बालकावर नजर ठेवून त्या बालकाचे परस्पर आपल्या शाळेत ऍडमिशन देण्याचा धंदा धारूर येथील एका दिव्यांग शाळेत उघडकीस आले असून या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे अक्षरश पालकांना आधारात ठेवून दिव्यांग बालकाचे ऍडमिशन करून त्या बालकांचा निधी खाण्याचा डाव पटेल. 82.न्युज हाणुन पाडला असून या प्रकरणी समाज कल्याण विभागाचे निरीक्षक नखाते यांनी दखल घेत संबंधित शाळेला नोटीस काढली आहे या नोटिसाचे उत्तर मिळाल्यानंतर या प्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करू अशी माहिती नकाते यांनी दिली बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील एका दिव्यांग विद्यार्थीनीचे ऍडमिशन धारूर येथील दिव्याग शाळेत झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी पटेल 82.न्युज ने पाठपुरावा केला दरम्यान शहरातील शिंदे नगर मध्ये राहणारे वटमारे यांची ही मुलीचे ऍडमिशन धारूरच्या त्याच दिव्यांग शाळेत असल्याचे समोर आले हा खळबळ जनक प्रकार संबंधित दिव्यांग शाळेच्या व्यवस्थापकांना समजल्यानंतर संबंधितांनी वटमारे यांची मुलीची टीसी तात्काळ देऊन टाकली आणि आपण आपल्या स्थरावर कुठेही ऍडमिशन घ्या असे सांगण्यात आले ज्या अर्थी वडमारे यांचा मुलगाच त्या शाळेत नव्हता तर त्यांनी टीसी कशी दिली आता हा नवीन मुद्दा समोर आला असून संबंधित शाळेत फक्त बोगस ऍडमिशनच होत नाही तर बोगस टीसी ही देण्यात येतो असे दिसुन येत आहे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून संबंधित शाळेला बोगस विद्यार्थी दाखला प्रकरणी समाज कल्याण विभागाने नोटीस जारी केली आहे संबंधित शाळेने अहवाल दिल्यानंतर समाज कल्याण विभागातून कारवाई होणार असल्याची माहिती नखाते यांनी दिली..... बोगस टीसी ही दिला बीड शिंदे नगर मध्ये राहणारे वडमारे यांचा मुलगा बीड शहरातील पोलीस कॉलनी येथील शाळेत शिक्षण घेत आहे यांचा दिव्यांग मुलाचे नाव धारूर येथील निवासी दिव्यांग शाळेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वडमारे यांनी संबंधित शाळेला विचारणा केली असताना प्रकरण मिटण्यासाठी वाद न घालता संबंधित शाळेने वडमारे यांच्या मुलाचा टीसी देऊन तुम्ही कुठेही ऍडमिशन घ्या अशी सहानुभूती दर्शवली यात सांगायचे तात्पर्य एवढेच की ज्या अर्थी वडमारे यांचा पोलीस कॉलनीच्या शाळेत शिक्षण घेत होते तर मग धारुरच्या शाळेत कधी गेला आणि त्याला टीसी कशी मिळाली याचा अर्थ असा होतो की त्या शाळेत बोगस विद्यार्थीच नव्हे तर बोगस टीसी ही दिली जातेय हा सर्व प्रकार संशयास्पद असून संबंधित दिव्यांग मुलाचे पालक आंदोलन आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत..... धारुर च्या त्या दिव्याग शाळेला समाज कल्याण विभागातून नोटीस..... खुलासा सादर झाल्यानंतर होणार कारवाई त्या दिव्यांग बालकाचे पालक आंदोलनाच्या पवित्र्यात...