माजलगावात धर्मनाथ बीज व महाप्रसादाचे आयोजन
माजलगाव ( प्रतिनिधी ):- येथील ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज देवस्थान मंदिर धर्मराज कडा बायपास रोड येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीज निमित्त दि.23 जानेवारी 2023 सोमवार रोजी सकाळी 6 ते 8 अभिषेक आणि सकाळी 9 ते 11 नवनाथ पारायण आणि नंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले तरी पंचकृषीतील भाविक भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन राजेभाऊ कुमावंत, अच्युतराव लाटे, दशरथ जमदाडे, मारोतराव सांवत, बालाजी कुमावत, दत्ता येवले, रामेश्वर जमदाडे, अभिजित गिलानकर,राम दराडे, मुंकुद जोगडे,आगे सर,सचिन कराळे, अशोक शेडुते सिर्धाथ साळवे,अनंत वाघमारे, आदिनी केले आहे.