बीड जिल्ह्यात खळबळ नायब तहसीलदारांना पेट्रोल टाकून जीवन जाळण्याचा प्रयत्न...
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज...
केज येथील नायब तहसीलदार यांना अज्ञात चौघांनी रस्त्यात अडवून भर दिवसा पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे यापूर्वीही नायब तहसीलदार यांच्यावर प्राण घातक हल्ला झालेला आहे याबाबत समजेलेली अधिक माहिती अशी की तेथील तहसीलदारांच्या नायब तहसीलदार आशा वाघ या दुपारचे जेवण करून आपल्या दुचाकीवरून तहसील कार्यालयाकडे येत होत्या तेव्हा एक चार चाकी वाहन आडवे आले त्यामुळे अशा वाघ यांनी आपली दुचाकी थांबवली असता त्या चार चाकी वाहनातून एक महिला व अन्य पुरुष असे चौघेजण खाली उतरले काही समजण्याच्या आधी नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला सुदैवाने अज्ञात हल्लेखोराचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर सध्या केज च्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.