भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया मध्ये राष्ट्रीय जनता दल चे असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष युथ विभाग -मिर्झा नदीम बेग यांच्या उपस्थितीत व जिल्हा जालना आढावा बैठक संपन्न.
दि.04डिसेंबर 2022 रविवार भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी व राष्ट्रीय युथ अध्यक्ष अरशद अ.कच्छी यांच्या आदेशानुसार आज रविवारी महाराष्ट्र युथ प्रदेशाध्यक्ष मिर्झा नदिम बेग याच्या उपस्थितीत मध्ये जालना जिल्हा अध्यक्ष मिर्झा इम्रान बेग यांच्या अध्यक्षमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकेत जालना जिल्ह्यातील वंचित, शोषित, अपंग, कामगार,वृध्दाना फोरम च्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ पोहचवण्यासाठी चर्चा करण्यात आली व या बैठकेत राष्ट्रीय जनता पक्षाच्या सैयद ताहिर सैयद तालिब सैयद, शाकिर सैयद पाशा, शेख अरबाज शेख़ नजीर ,आतेफ राजेखान पठान ,अकबर नासेर पठान , व समाजकसेवक मिर्झा यासेर बेग या सर्व कार्यकर्त्यांनी जाहिर प्रवेश केला आहे.
या बैठकेत भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे महाराष्ट्र युथ प्रदेशाध्यक्ष मिर्झा नदिम बेग ,जालना जिल्हा अध्यक्ष मिर्झा इम्रान बेग, जिल्हा उपाध्यक्ष अजीम खान, युथ शहर अध्यक्ष इम्रान शेख रसुल,मुब्बशीर शेख युथ शहर सचीव, युथ तालुका अध्यक्ष उपस्थितीत होते या बैठकीचे आयोजन उपजिल्हा अध्यक्ष अजीम खान यांनी केले.
मिर्झा इम्रान बेग यांनी सर्वांचे आभार मानले .