दोन महिन्यांच्या बाळाला भेटण्यास येणाया पित्याचा अपघाती मृत्यू.....
माजलगाव प्रतिनिधी -शेख अखिल अजिज
आष्टी.दोन महिन्याच्या आपल्या बाळाला भेटण्यासाठी गावी येत असताना पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी फाट्याजवळ वळणावर दुचाकीचा ताबा सुटला अन् अपघात झाला या पिताचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील युवराज पोपट जगताप वय वर्ष 34 हा गेला अनेक वर्षापासून शेवगाव तालुक्यातील भेंडा सहकारी साखर कारखान्यावर हमाली करायचा त्यामुळे कुटुंबासह कारखान्यावर राहत होता पत्नीला दिवस गेल्याने ती माहेरी गेली होती बाळत झाल्यानंतर माहेरहुन ती ती सासरी आल्यावर वडील आपल्या दोन महिन्याच्या तान्हुल्याला भेटण्यासाठी शुक्रवारी गावाकडे येत असताना पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी फाटा नजी एका वळणावर दुचाकी एम.एच. क्रमांक 21 डी.के3566. वरील ताबा सुटून पुलाच्या खाली जाऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना रात्रीच्या सुमारास 9.च्या दरम्यान घटना घडली आहे मृत्यूदावर पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले त्याच्या पश्यात. आई .वडील .भाऊ .बहिणी पत्नी एक .मुलगा. एक .मुलगी. असा परिवार आहे.......