औरंगाबाद शहरात बीड जिल्ह्यातील माणसातली माणुसकी जपणारी माणसं
प्रतिनिधी सखाराम पोहिकर
औरंगाबाद शहरात राहणारे बीड जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी दिनांक 23 आॅगस्ट 2012 साली चंपावती प्रतिष्ठानची स्थापना केली. याच्या मुख्य मागचे कारण म्हणजे गेवराईचे पंकज पाटेकर देवगिरी काॅलेज संभाजीनगर मध्ये नौकरी करत असल्याने औरंगाबाद मध्येच रहातात त्यांना औरंगाबाद शहरात मुख्य रस्ता जालना रोडवर स्वताच्या अपघातात भयानक अडचणी आल्याने, या आपण ग्रामिण भागातील असल्याने, औरंगाबादेत ओळख नसल्याने अक्षरश: अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले, म्हणून यांनी त्यांचे आदर्शस्थान गुरुवर्य महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते प्रदीपदादा सोळुंके, प्रा.राजेंद्र बरकसे यांना त्यांनी कल्पना सांगितली आणि होकार देताच बीड जिल्ह्यातील कोण कोण औरंगाबाद शहरात रहातात याचा अधिक शोध घेत सर्वेक्षण केले त्यानंतर प्रथमतः ठराविक चळवळीतल्या विविध जाती धर्माच्या महीला पुरुषांना एकञ करत बैठक पार पडली. अन् चंपावती प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या वृक्षाचे रूपातंर वटवृक्षात झाले त्यानंतर हळुहळू वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमातून बीड जिल्हावासियांचे वास्तव्य असणाऱ्या विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना "चंपावतीरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सतत दोनचार वर्षे बीडकरांचे असे प्रोग्राम होत गेले, शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून औरंगाबाद शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बहुसंख्य आहे. अनेकांच्या आर्थिक अडचणी तपासून एक एक वर्षासाठी दत्तक स्वरुपात ( शैक्षणिक खर्च व भोजन वही पेन पुस्तके असे) काम चंपावती प्रतिष्ठानने तेवढ्याच ताकदीने केल्याले आहे. खरं तर या चंपावती प्रतिष्ठानची स्थापना पंकज पाटेकर या ध्येयवेड्या तरूणांच्या संकलपनेतुनच झाली, पंकज पाटेकर यांचे प्राथमिक शिक्षण गेवराई येथे झाले. प्रदीपदादा सोळंके हे त्यांचे शिक्षक होते. आर बी आट्टल कॉलेजला शिकत आसतांना पंकज पाटेकर माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडीत यांचे जेष्ठ पुत्र विकासपुरुष अमरसिंह पंडीत भैय्यासाहेबांच्या संपर्कात आले, तेव्हा ते इंदीरा आय काँग्रेसमधे होते. ते जि,प.सदस्य होते. पंकज पाटेकर यांची तळमळ व परिस्थिती पाहता भैय्यासाहेबांनी पाटेकर जिथे शिकत होते त्याच महाविद्यालयात नोकरीची आॕर्डर काढून, पंकज सारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, पुढे काँग्रेस मधून पवार साहेब बाहेर पढून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्याने भैय्यासाहेबासोबत अनेक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या धुसमतेमुळे भैय्यासाहेब मुंढे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाऊन ते विधानसभेवर निवडून गेले. महाराष्ट्र शिक्षण प्रासारक मंडळातील बदलाने अट्टलमधून विरोधकांनी राजकारण करत पंकज पाटेकर यांची अंबाजोगाई येथे बदली केली, तिथून बदली होत होत माजलगांव तदनंतर ०७ ला औरंगाबाद देवगिरीत आले. नवे शहर नवे गाव पुर्ण माहीती होऊसत्तर पार तिन वर्ष लागले. पंकज पाटेकर अचानक मोटरसायकवरुन बायको लेकरं पडली, पिच्छर स्टाईल मी रस्त्यावरील लोकांना वाचविण्याची विनंती केली, पण च्छे रक्तबंबाळ आवस्थेत आता बायको गेली समजून ते स्तब्ध झाले. तेवढ्यात एका जणाणे बीड स्टाईल एका चालत्या गाडीला थोपवून मला त्यात बसून त्या अज्ञात मुलाने हॉस्पिटलमध्ये नेले. कुणी वाचवले नही त्याने का वाचवले असे विचारताच त्याने सांगितले तुमच्या गाडीची MH 23 ही बघून मला वाटले हे पडलेले आपल्या बीड जिल्ह्यातील म्हणून मी मदत केली. बस्स धन्यवाद करत सल्युट केला, सर्व सुरळीत झाले बायकोला मेंदूला मार लागून पण ओके झाली, छोट्या साडेतिन सालाच्या चि. पियुषला मार पण लागला, तो पण निट झाला. बीड जिल्ह्यातील सर्व छोठी मोठी विविध क्षेत्रातील माणसं एकञित आणल्याचा मला बरे वाटले. तेवढ्यातच पंकज पाटेकरला कँसर झाल्याचे निदर्शनास आले . पायाखालची वाळू सरकली, कसे काय करावा चिंतेत पडून खचून गेलेल्या पंकज पाटेेकरची वार्ता माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कानावर पडताच भैय्यासाहेब फोनवर पंक्या तु कुठय रे, मी जे काय काय ऐकतोय ते खरे का ? मी हो म्हणताच.! आताच्या आता तु माझ्याकडे ये आणि मुंबईला जाण्याची तयारी कर, तेवढ्यात पंकज म्हणाले साहेब मुंबईला आपले कुणी नाही घरचे लोकं सोबत घेऊन जायचे मोठी कसरत, तर साहेब म्हणतात मी सारे करुन प्राॕब्लेम साॕल करुन देतो, मी स्वःत तेथील कँसरच्या डॉक्टरांना बोललो, कसलीपण अडचण येणार नाही, तु चल पुढे हो ॲडमिट मी आलोच. तेव्हा मला वाटले आता आपल्याला काहीच होणार नाही.. देवासारखे साहेब सोबतीला म्हटल्यावर माझं उदास झालेले कुटुंब आनंदादीत झालं. त्यातून मी निटनेटका बाहेर पडलो, आता पुन्हा जोमाने चंपावती प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीडकरांचा महामेळावा घेण्याचा माणस आहे. यामध्ये बीडचे भूमीपुञ अधिक परिश्रम घेत आहेत, प्रदीपदादा सोळुंके, डॉ.पटेल एस एस शेख साहेब, बालाघाटचे दबंग पोलिस अधिकारी सुर्यकांत कोकणे, मा. केद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड पाटील, ॲड सुधिर आप्पा चौधरी, शिवाजी झांबरे, डॉ.राणी पवार, श्रीकांत देशमुख, हनुमान सोनवणे, जालिंदर भाऊ शेंडगे, ॲड कल्याण खोले, अमोल फडके, ओमराजे कांबीलकर,विक्रम भालशंकर, हनुमान सोनटक्के, प्रा. वसंत सानप, सुनिल शेलाकर, रामदास शेमाडे, चंद्रकांत मोरे, रामदास वाघमारे आदींचा सहभाग आहे.