31 मार्च पर्यंत अतिदृष्टीचे नुकसानीचे अनुदान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार...
मुख्यमंत्री ची घोषणा आमदार प्रकाश सोळंके यांनी वेधलें होते लक्ष..
माजलगाव प्रतिनिधी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अतिवृष्टी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते त्यातच प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते व अतिदृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याचे माजलगाव चे विद्यमान आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात निदर्शनास आणून दिले यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 मार्च पर्यंत बीड जिल्ह्यातील संपूर्ण अतिदृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली अधिवेशनात आमदार सोळंके यांनी शेतकरी राजाचा आवाज उठवत अनुदान बाबत लक्ष वेधून घेतले केवळ सरकारमधील मंत्री ते वाटप केल्याचे सांगत आहे मात्र आज पर्यंत कसलाही अतिवृष्टीचा अनुदान भेटलेला नाही असे प्रकाश सोळंके यांनी सांगितले होते मात्र आज पावतो जबाबदारी सांगतो ना सतत धार पावसाचे व अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी तीन हजार तीनशे कोटीची अतिरिक्त मागणी आहे यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल व शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या सहा हजार आठशे कोटी पैकी सहा हजार कोटीचे वाटप झाले आहे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे आतापर्यंत अनुदानापोटी4 हजार 700 कोटींचा वितरित करण्यात आले असून जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे तसेच अतिदृष्टीचे व सततच्या पावसाने अनुदान 31 मार्च पर्यंत वाटप करण्यात येईल असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गवाही दिली आहे.