माजलगाव शहराच्या सिटी सर्व्हे करण्याचा जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश...
माजलगाव प्रतिनिधी..दि.4. माजलगाव शहराचा झालेल्या अनधिकृत विकासाचे परिणाम आज माजलगाव शहरातील नागरिकांना भोगावे लागत आहेत एक ना अनेक बारा भानगडी होऊन जागा जमिनीचे अनेक तक्रारी होताना दिसतायेत या तक्रारीचा एकदाचा निपटारा होण्यासाठी आता जिल्हाधिकारी यांनी मनावर घेतले असून भूमी अभिलेख कार्यालयांत पत्र देऊन माजलगाव शहराच्या सिटी सर्व्हे करण्याचा आदेश दिले आहेत माजलगाव शहरातील शासकीय जमिनीची चोही बाजूने हडप केलेल्या गेलेल्या आहेत तसेच इतर ओपन स्पेसही गिलकृत केले गेलेले आहेत शहरातील विविध सर्वे नंबरचे एक नाही दोन-तीन मन मर्जीप्रमाणे नकाशे लेआउट दाखवून जागा हरपण्याचे उद्योग सध्या माजलगाव शहरात जोरात चालू झालेले आहेत त्यामुळे शहराचा आणि अधिकृत विकास झाला त्याचे परिणाम शहरातील नागरिकांना भोगावे लागत असून नगरपरिषद कडे अनेक तक्रारी निवेदन नागरिकांना कारल्यात काम करणारे नगरपरिषद व महसूल कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रासाला समोर जावे लागत आहे या सर्व प्रश्नाचा एकदाचा निपटारा व्हावा म्हणून माजलगाव शहराचा शासकीय नियमानुसार विकास करता येईल महसुलात ही वाढ होईल नागरिकाचे प्रश्न मार्ग निकाली निघण्यासाठी माजलगाव नगरपरिषद चे प्रशासक तथा मुख्य अधिकारी अविनाश निळेकर यांनी जिल्हा अधिकारी यांना पत्र देऊन शहराचा सिटी सर्व्हे करण्याची मागणी केली होती अखेर बीड जिल्हाधिकारी यांनी या बाबीचा विचार करून जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बीड यांना पत्र देऊन शेती सव्हे करण्याचा आदेश दिला आहे.... सिटी सर्वेतून कुणाची होणार अडचण.... माजलगाव शहराचा सिटीसर्वे झाल्यावर माजलगाव शहरातील ओपन स्पेस शासकीय जमिनी उघडकीस येणार आहेत त्यातून शासकीय जमिनी ओपन स्पेस डीपी रोडवर बस्तान मांडल्याच्या मोठ्या अडचण निर्माण होणार आहेत..