सर्व आदरणीय संपादक/ पञकार संघ/बंधु/सामान्य जनतेला मोर्चात सहभागी होण्याचे जाहिर नम्र आवाहन केन्द्र सरकार व राज्य सरकार यांच्याविरुद्ध मोर्चा.......
खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग यांच्या वेतन संबधित गंभीर समस्या व गोरगरीब रूग्णांचा खाजगी हाॅस्पिटल मधील भरमसाठ शुल्क वाढीच्या विरोधात लढा एक सामाजिक, दुर्लक्षित, अतिगंभीर प्रश्न..........
चला एक दिवस स्वतः साठीच......
आपल्या आरोग्य सेवेतील सहकारी यांच्यासाठीच......
ऐतिहासिक मोर्चात सर्वांनीच सहभागी व्हावे......
जय संविधान🇮🇳🇮🇳🏥🏥⚖️⚖️ जय कामगार
महाराष्ट्रातील खाजगी हाॅस्पिटल..... मधील नर्सिंग स्टाफ, (नर्सिंग विद्यार्थी, पॅरामेडिकल स्टाफ, लॅबोरेटरीमधील स्टाफ, रिशेपषनिस्ट, मेडिकल वर काम करणारे( होलसेल व चिल्लर), ॲबुंलन्स ड्रायव्हर, डाॅक्टरांचे ड्रायव्हर ,सफाई कर्मचारीवर्ग, स्वयंपाक बनवणाऱ्या मावशी,वार्ड बॉय, (मेहतर )बाथरूम साफ करणारे कर्मचारीवर्ग ,आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका,परळी उपजिल्हा रुग्णालयातील कंञाटी नर्सेस व ईतर कंञाटी कर्मचारीवर्ग यांसारखे अनेक खाजगी / निमशासकीय हाॅस्पिटल मधील संघटित/ असंघटित..... सर्व यांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनीच मला आतापर्यंत खुप खुप मदत.... केली आहे 🤝🤝 सहकारी अजय मुंडे यांना आर्थिक मदत,आपण सर्वांनीच मला आपले नौकरी चे ( स्पॉट पंचनामा)फाॅर्म भरून दिले,काही डाॅक्टरांचे वाढदिवस पण आपण मिळून साजरे केले , आपण हे सर्व अचानक नाही केले डाॅक्टरांनी आपल्याला कसलाच प्रतिसाद दिला नाही ,दुर्लक्षित केले आपण त्यांना निवेदन पण दिलेत सुरूवातीलाच, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना मी स्वतः भेटलो सुद्धा, विनंती सुध्दा केली आपल्या सर्वांसाठी ते पण काहीच करू शकले नाहीत ,आपण संघटित✊✊💪💪🤝🤝 नाही हे पण त्यांना चांगलेच माहिती होते, (पण आता काळ बदलला )जिल्हा कामगार अधिकारी⚖️⚖️ यांना मागणी, निवेदन, तक्रार केली पाठपुरवठा चालु आहे अपेक्षित सहकार्य नाही ( कारण आपले संघटन) त्यांनी चक्क एक- दोन नव्हे आतापर्यंत 17 नोटीस पण पाठवल्या परत डाॅक्टरां आपली ताकद तिथे दाखवली असो परळी ते बीड ते औरंगाबाद ते मुंबई ते परत औरंगाबाद, बीड, परळी शेवटी शासनाने पण हे सांगितले की रस्त्यावर उतरून आंदोलन करणेच पर्याय आहे ,संघटित होणेच अधिक गरजेचे आहे ,पुढे... असेच जर चालु ठेवायचे असेल,आपल्या न्याय व हक्कासाठी ,मागण्यांसाठी पुढचा टप्पा गाठायचा असेल , शासकीय नियमानुसार पगार, पि.एफ, डि.ए,. बोनस,भत्ता , मुलांच्या शिक्षणासाठी 0% जिरो टक्के व्याजदराने कर्ज, मोफत. घरकुल,मोफत बस,रेल्वे सेवा , पेन्शन पाहिजे असेल ते पण *केन्द्र सरकार व राज्य सरकार......🇮🇳🇮🇳⚖️⚖️...... यांच्याविरुद्ध तर येणाऱ्या (परळी वैजनाथ जि.बीड) दि.03.02.2023 शुक्रवार रोजी 11.वा.टॉवर पासुन मोंढा मार्गानेच, स्टेशन रोड ते छ.शिवाजी महाराज चौक ते श्री भगवान बाबा महाराज चौक मार्गानेच तहसीलदार कार्यालयावर भव्य धडक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय परिचारिका परिषद, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस, युनायटेड नर्सेस असोसिएशन, शहिद भगतसिंग ब्रिगेड , भारतीय ऑल सुरक्षा फोरम ऑफ इंडिया, सत्यमेव जयते संघटना, बांधकाम कामगार संघटना, परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्था, नाम फाऊंडेशन व ईतरही अनेक कामगार संघटनांनी केले आहे
आपलाच आनिल जायभाये बीडकर
9011772189