अल्पसंख्याक तरुणांनी मौलाना आजाद मुदतकर्ज योजनेचा लाभ घ्यावा - जे. डी. शाह
मौलाना आजाद मुदत कर्ज योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मुंबईच्या विद्यमाने राज्यातील अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गातील होतकरू बेरोजगारांना पान टपरी पासून किराणा दुकान आणि विविध प्रकारच्या व्यवसायासाठी व तीन चाकी ते चार व सहा चाकी वाहाणाच्या स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करुन त्यांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचावण्याच्या दृष्टीने राबविण्यांत येत आहे. सदरहू मुदत कर्ज योजना ही मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलातून राबविण्यात येते. या योजनेंतर्गत वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी आणि जैन समाजातील बेरोजगार उमेदवारांना ५ लाखा पासून रुपयांपासून ३० लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येते. यापैकी ९५ टक्के रक्कम महामंडळाकडून कर्ज स्वरुपात दिली जाते आणि ५ टक्के रक्कम लाभार्थीनी स्वत: उभारावयाची आहे. कर्ज रकमेवर ८ टक्के द.सा.द.शे. दराने व्याजाची आकरणी केली जाते. कर्जाची परतफेड ५ वर्षाच्या कालावधीत २० त्रैमासिक हप्त्यात करावयाची आहे. तरी बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील होतकरू तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जे. डी. शाह यांनी ऐका प्रसिद्ध पत्राद्वारे केले आहे.
प्रसिद्ध पत्रकात पुढे म्हटले आहे. की अल्पसंख्याक समाजातील अनेक हुशार होतकरू तरुण असुन त्यांना आपला छोटा मोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रा. फायनान्स किंवा खासगी सावकाराकडून जास्त दराने कर्ज काढून व्यवसाय करावा लागत आहे. अशांना आता कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झाले आहे . यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. निगममार्फत कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना यांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यात करण्यात येते. या योजनांमध्ये लाभार्थ्याच्या आर्थिक उत्पन्न
मर्यादेच्या आधारे काही सुधारणा करण्यात आल्या असून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य सरकाराकडुन करण्यात आले आहे. योजनांतर्गत अर्ज स्वीकारण्यासाठी ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम
आजाद यांच्या जयंती दिनापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. योजनांचे अर्ज महामंडळाच्या बीड येथील जिल्हा कार्यालय रब्बानी मंजिल २ रा मजला रेहमत नगर एस पी ऑफिस समोर बार्शी रोड बीड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ उपलब्ध आहेत अशी माहिती जे. डी. शाह यांनी दिली आहे. पत्रात शेवटी म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील विविध प्रकारच्या व्यवसाय करू इच्छुक तरुणांनी उत्पादकावरील आधार व्यवसाय करणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. यासाठी क्रेडीट लाईन १ मधील लाभार्थीना २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असा ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तसेच क्रेडीट
लाईन २ मध्ये ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून यातील पात्र पुरुष लाभार्थीकरिता ८ टक्के विना हमी शुल्क असलेले८ टक्के वार्षिक व्याजदर तर महिला लाभार्थीकरिता ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तसेच अल्पसंख्याक महिलांना अस्मिता सारख्या मायक्रोवेव्ह फायनान्स च्या चाळ्यातुन सुटका करण्यासाठी बचतगटांसाठी सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविली जाते. याअंतर्गत क्रेडीट लाईन १ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह ९ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तर क्रेडीट लाईन २ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास दीड लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह पुरुषांसाठी १२ टक्के तर महिलांसाठी १० टक्के वार्षिक व्याजदर आहे. तरी बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याकासह मुस्लिम समाजातील तरुणांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या बेरोजगारी वर मात करून यशस्वी उद्योगजक होऊन दाखवावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते जे. डी. शाह यांनी केले आहे.